पुणे: गुरुवारी रात्री पुणे,पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील काही भागांत जोरदार पाऊस झाला.सर्वाधिक पाऊस पिंपर्री चिंचवड भागात 46 तर शिवाजीनागर भागात 26 मी मी पावसाची नोंद झाल. गुरुवारी रात्री दहा वाजता सुरू झालेला पाऊस उत्तर रात्रीपर्यंत सुरूच होता.
पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास पाऊस थांबला ,तोवर संपूर्ण शहराला तुफानी पावसाने झोडपून काढले होते. रात्री 10 ते 10.48 असा सुमारे पाऊण तास पावसाचा मोठा जोर होता. त्यानंतर मात्र पाऊस संततधार वेगाने रात्रभर पडत होता. (Latest Pune News)
पावसाचा जोर उत्तर रात्री जास्त नसला तरी रात्रभर भिज पाऊस झाला त्यामुळे पहाटे संपूर्ण शहरात दाट धुके पसरले होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत धुक्याची चादर शहरावर होती. त्यानंतर थोडी उघडीप मिळाली. दरम्यान शुक्रवारी देखील शहरासह जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून सायंकाळी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
गुरूवारी शहरात झालेला पाऊस (मिमी)
चिंचवड 47.
मगरपट्टा 43.5
डुडुळगाव 40.
लवळे 34
दौंड 32.5
हवेली 32
एनडीए 28.5
नारायणगाव 27
शिवाजीनगर 26.
हडपसर 25
तलेगाव ढमढेरे 23.5
लोणावळा 22.5
लवासा 19.5
माळीन 19
निमगिरी 16.5
गिरीवन 16.5
राजगुरुनगर 14.5
तळेगाव 10
भोर 10.
बारामती 10
पुरंदर 5.5
दापोडी 2
कोरेगाव पार्क 0.5