खडकवासला: पानशेतसह वरसगाव मुठा खोर्यात पावसाचा जोर वाढल्याने गेल्या 24 तासांत खडकवासला धरणसाखळीत 0.67 म्हणजे जवळपास पाऊण टीएमसी वाढ झाली. रविवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 18.63 टीएमसी (63.92 टक्के) इतका साठा झाला होता.
धरणक्षेत्रात सायंकाळी मुसळधार पाऊस पडत होता. दरम्यान, शनिवारी (दि. 5) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 17.96 टीएमसी इतका पाणीसाठा होता. (Latest Pune News)
धरणक्षेत्रातील घाटमाथ्यासह शिरकोली ठाणगाव, घोडशेत, पोळे. आंबेगाव, साईव बुद्रुक आदी ठिकाणी अधुनमधून सरी कोसळत आहेत. त्यामुळे पानशेत, वरसगाव मध्ये पाण्याची आवक कायम आहे.
खडकवासला धरणमाथ्यावर तुरळक पाऊस पडत आहे. धरणक्षेत्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या पानशेत, वरसगाव व टेमघर धरणमाथ्याखाली पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे खडकवासलातुन मुठा नदीत 1 हजार 655 क्सुसेकने विसर्ग सुरू आहे. रविवारी दिवसभरात टेमघर येथे 36, वरसगाव येथे 12, पानशेत येथे येथे 12 मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला येथे तुरळक पाऊस पडला.