अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ८ मार्च २०२६ रोजी झालेल्या एका सामन्यानंतर क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने राष्ट्रीय ध्वजाचा योग्य सन्मान राखला नाही, अशी तक्रार दाखल करण्‍यात आली होती.  Pudhari Photo.
पुणे

Hardik Pandya Controversy | क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्‍या अडचणीत वाढ; तिरंगा अवमान प्रकरणाची तक्रार गुजरात पोलिसांकडे वर्ग

Hardik Pandya Controversy | पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्‍यात आली होती तक्रार

पुढारी वृत्तसेवा

Hardik Pandya Controversy

पुणे : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्याविरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार आता गुजरात पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर ८ मार्च २०२६ रोजी तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप हार्दिक पांड्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी पुण्यातील वकील वाजेद खान यांनी तक्रार दाखल केली होती.

काय घडलं होतं?

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ८ मार्च २०२६ रोजी झालेल्या एका सामन्यादरम्यान, क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याने राष्ट्रीय ध्वजाचा योग्य सन्मान राखला नाही, असा आरोप करण्यात आला होता. या कृत्यामुळे राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान झाल्याचे नमूद करत वकील वाजेद खान यांनी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदवली होती.

पुणे पोलिसांकडून अहमदाबाद पोलिसांना पत्र

वकील वाजेद खान यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. मात्र, संबंधित घटना ही गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर घडल्याने, अधिकृत कार्यवाहीसाठी हा अर्ज वर्ग करणे आवश्यक होते. त्यानुसार, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग), पुणे शहर यांच्या निर्देशानुसार सदर तक्रारी अर्ज पुढील कायदेशीर चौकशीसाठी अहमदाबादचे पोलीस आयुक्त यांच्याकडे वर्ग करण्यात आल्‍याचे शिवाजी नगर पोलीस ठाण्‍याचे वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

पुणे पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरून अर्ज निकाली

याबाबत पुणे पोलिसांनी तक्रारदाराला कळवले आहे की, "आपण केलेल्या तक्रारी अर्जाची उचित दखल घेण्यात आली असून, घटनेचे ठिकाण गुजरात राज्यातील अहमदाबाद असल्याने तो पुढील कार्यवाहीसाठी तेथील पोलीस आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. पुणे पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरून हा अर्ज आता निकाली काढण्यात येत आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT