Pune Crime News Pudhari
पुणे

Hadapsar Spa Raid: स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तीन पीडित तरुणींची पोलिसांनी केली सुटका

स्पा मालकिणीसह मॅनेजरवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करत हडपसर पोलिसांनी तीन पीडित तरुणींची सुटका केली, तर याप्रकरणी, स्पा मालकीन अश्विनी मुरडे (रा. कल्याणीनगर) आणि मॅनेजर रकबुल अबुल हुसेन याच्यासह दोघांच्या विरु्द्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस हवालदार बाबू लोणकर यांनी फिर्याद दिली आहे.

मगरपट्टा सिझन मॉल समोरील द कॉस्मो पॉलिस बिल्डिंगमध्ये द फॉरेवर नावाचे स्पा सेंटर आहे. त्या स्पा सेंटरमध्ये मसजाच्या नावाखाली तरुणींना पैशांचे प्रलोभन दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते.

याबाबतची गोपनिय माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून पथकाने खात्री केली. त्यावेळी तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. त्यानुसार हडपसर पोलिसांच्या पथकाने बुधवारी (दि. २२) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली.

या वेळी तीन पीडित तरुणी मिळून आल्या. दोघे आरोपी तरुणींना पैशाचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत होते. त्यातून मिळणाऱ्या पैशावर हे दोघे आपली उपजीविका भागवत असल्याचे समोर आले आहे. दोघे आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास गुन्हे निरीक्षक नीलेश जगदाळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT