पुणे

तळेगाव परिसरात गुबू.. गुबू…!

backup backup

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा

नंदीबैल घेऊन गावोगावी फिरणारी नंदीवाले ही जमात आहे. ही मंडळी सजविलेल्या नंदीबैलाला दारोदारी नेतात आणि लोकांना त्यांचे भविष्य सांगून आपला चरितार्थ चालवितात. सध्या तळेगाव दाभाडे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नंदीबैलवाले दारोदारी फिरताना दिसून येत आहेत.

बारातमी येथे राहणारा प्रेम वाईकर हा नंदीबैलवाला आणि त्याचे सोबती गेल्या महिन्याभरापासून तळेगाव परिसरात आप्लाय रोजीरोटीसाठी नंदीबैलासह फिरत आहेत.

या खेळातून आम्हांला पोटापुरते तसेच बैलाच्या चार्‍यापुरते कसेबसे पैसे मिळतात. आमचे पणजोबा, आजोबा, वडिलांनी सांभाळलेली परंपरा आम्ही पुढे चालवत असल्याचे वाईकर यांनी सांगितले.

नंदीबैल घरासमोर आल्यानंतर नंदीवाला त्याच्याजवळील वाद्य वाजवून नागरिकांना आपण आल्याची वर्दी देतो. एखाद्याच्या घरासमोर उभे राहून पैसे, धान्य देण्याविषयी आवाहन करतो.

आपल्या लाडक्या बैलास तसेच कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी तो गावोगावी भटकंती करतो. नंदीबैल आल्याचे समजले की, परिसरातील बाल- गोपाल, महिला जमा होतात.

महिला मंडळी हळद,कुंकू लावून नंदी बैलाची पूजा करतात. सोबत आलेल्या माणसाला धान्य, पैसे देतात. नंदीवाला त्याच्या सभोवती जमलेल्यांपैकी काही जणांना समोर बोलावून नंदीला काही प्रश्न करतो.

त्यानंतर नंदीबैल मान हलवून होकरार्थी किंवा नकारार्थी उत्तरे देतो. आपले भविष्य जाणण्यासाठी नंदीबैलाभोवती नागरिकांची गर्दी होते.या जमलेल्या नागरिकांतून काही जण नंदीवाल्यास पैसे देतात तर काही धान्य देतात. या खेळावरच आमच्या कुटुंबाचा चरितार्थ चालत असल्याचे वाईकर सांगतात.

https://youtu.be/6Od5mMZ4sb8

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT