पुणे

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा महायुतीच जिंकेल : पणन मंत्री अब्दुल सत्तार

अमृता चौगुले

पुणे : प्रतिनिधी : देशाच्या लोकसभा निवडणूकांचे घोडामैदान आठ महिन्यांवर आले आहे. शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकांत एनडीएचा पराभव होईल असे केलेल्या वक्तव्याच्याविरुध्द स्थिती आहे. कारण राऊत बोलतात त्याच्या नेमके उलटे होते. त्यांचा अंदाज खरा नसून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सर्वाधिक जागा जिंकत महायुती एक नंबरचा पक्ष राहील, असा विश्वास राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. पुण्यात राज्य वखार महामंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त ते आले असता माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

सत्तार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात विकास केला आहे़ पहिल्या पाच वर्षात त्यांनी विकास केला नसता तर निवडून आले नसते़ आता पुन्हा तिसर्‍यांदा ते निवडून येतील़ त्यांची शेतकरी, शेतमजूर, वाड्यावस्त्या, तांड्यापर्यंत गरीबांची सेवा करण्याचा संकल्प केला आहे़ आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येईल. त्यामध्ये राज्यांत भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या सर्वाधिक जागा निवडून येत महायुती एक नंबर ठरेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

मी मंत्रीपदावरुन नाराज असायचा प्रश्नच नाही़ यापुर्वी माझ्याकडे कृषी खाते होते आणि आता पणन विभागाचे मंत्रीपद आहे. कृषी विभागापेक्षा ते कमी नाही़ औंरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत वादावादी झाल्याच्या प्रश्नावर सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले की, काही लोकप्रतिनिधींनी निधी मिळत नसल्याची तक्रार केली होती़ तो निधी पालकमंत्र्यांनी द्यावा अशी मागणी होती. त्याबाबत आश्वासन दिल्यानंतर बैठक खेळीमेळीत संपल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT