Gold Silver Rate Pudhari
पुणे

Gold-Sliver Price: सोने दरात तीन हजारांची घसरण; चांदी दर वर्षातील नीचांकी स्‍तरावर

जानेवारी २०२६ पासूनचा सोने-चांदीचा हा नीचांकी दर आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अमेरिका-इराणमध्ये झालेला शांतता करार, कच्च्या तेलाच्या भावात झालेली घसरण यामुळे सोने आणि चांदीच्या दरातही घट झाली आहे. स्थानिक बाजारात २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव तीन हजार रुपयांनी घटून १ लाख ४१ हजार रुपयांवर आला आहे. तर चांदीचा भाव प्रतिकिलो सात ते दहा हजार रुपयांनी घटून २ लाख २० हजार रुपयांवर आला आहे. जानेवारी २०२६ पासूनचा सोने-चांदीचा हा नीचांकी दर आहे.

अमेरिका आणि इराण युद्धाला २८ फेब्रुवारीला तोंड फुटले. त्यापूर्वी अमेरिकन व्यापार शुल्काची अनिश्चितता, रशियन तेल खरेदीवर घातलेले निर्बंध यामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता पसरली होती. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दराचा भडका उडाला होता.

त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव पावणेदोन लाखांच्या घरात गेला होता. तर चांदीचा प्रतिकिलो दर तीन लाखांवर गेला होता. युद्धविराम झाल्याने कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १ लाख ४१ हजारांवर आला आहे. वस्तू आणि सेवा करासह (जीएसटी) २४ कॅरेटचा भाव १ लाख ४५ हजार २३० रुपये होतो.

तर २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १ लाख २९ हजार ७२० असून, जीएसटीसह रक्कम १ लाख ३३ हजार ६१० रुपये होते. चांदीचा प्रतिकिलो भाव २ लाख २० हजार रुपये असून, जीएसटीसह रक्कम २ लाख २६ हजार ६०० रुपये होते, अशी माहिती सराफा व्यावसायिक वस्तूपाल रांका यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT