पुणे: तरुणीशी इन्स्टाग्रामवर ओळख निर्माण करून तिला लॉजवर नेऊन तिच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोनसाखळी पाहण्यास घेऊन ती परत देण्यासाठी तिला शरीर संबंधात भाग पाडणार्या व नंतर तिचा गर्भपात घडवून आणणार्या एकावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सौरभ धोत्रे (वय 25, रा. वडारवाडी, दीपबंगला चौक) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत 21 वर्षीय तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार मे 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2024 मध्ये फिर्यादी आणि तरुणीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यातून त्याने तरुणीला भेटण्यास बोलवून तिला एका लॉजवर नेले. तेथे तिला तिच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सेानसाखळी पाहण्यास मागितली. त्यानंतर ती सोनसाखळी परत करण्यासाठी त्याने तिच्या इच्छेविरोधात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले.
आरोपीने तिची सोनसाखळी परत न केल्याने त्याने तिच्यासोबत बोलणे बंद केल्याणे व भेटणे बंद केल्याने त्याने तरुणीचा बनावट इन्टाग्राम आयडी तयार केला. त्यावरती तरुणीचे व आरोपी सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच, आरोपीने तरुणीच्या वडिलांच्या दुकानावर जाऊन 70 हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास आरोपीने त्याचे आणि तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.