Police Pudhari
पुणे

Ghodagaon Police: घोडेगाव पोलिसांच्या तपासाला यश; चार गुन्ह्यांत ८ आरोपींना न्यायालयाची शिक्षा

खेड व घोडेगाव न्यायालयाचा निर्णय; आरोपींना कारावासासह दंडाची शिक्षा, पोलिसांच्या प्रभावी तपासाचे फलित

पुढारी वृत्तसेवा

मंचर: घोडेगाव पोलिस ठाण्याच्या प्रभावी तपासामुळे खेड व घोडेगाव न्यायालयाकडून एकाच दिवशी ४ स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये ८ आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी माहिती दिली.

आरोपी आकाश दत्तात्रय काळे, लत्ता दत्तात्रय काळे (दोघेही रा. घोडेगाव, ता. आंबेगाव) यांना खेड न्यायालयाने दोषी ठरविले. न्यायालयाने आरोपींना १ वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच ६ महिने सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे.

आरोपी गणेश चंद्रशेखर उनकुले (रा. घोडेगाव ता. आंबेगाव) यास खेड न्यायालयाने दोषी ठरविले. आरोपींना एक वर्ष सश्रम कारावास व १००० रुपये दंड तसेच एक वर्ष सश्रम कारावास व १००० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद आणि ६ महिने सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे.

आरोपी प्रसाद शांताराम सैद, किशोर तुळशीराम काळे यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, घोडेगाव यांनी दोषी ठरविले. या आरोपीस न्यायालयाने १२०० रुपये दंड, व दंड न भरल्यास ७ दिवस साधा कारावास तसेच महा दारूबंदी कायद्यानुसार कोर्ट उठेपर्यंत कोर्टामध्ये बसून राहाणे, तसेच ५००० रुपये दंड व दंड न भरल्यास ७ दिवस साधी कारावास शिक्षा सुनावली आहे.

आरोपी अमर ऊर्फ सोनू काशिनाथ डगळे, सुनील सोमनाथ बांबळे, संदीप फकीर असवले यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव यांनी दोषी ठरविले. त्यांना प्रत्येकी ५००० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास तसेच १००० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास याप्रमाणे शिक्षा सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT