वेल्हे: पानशेत खोर्यातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात रविवारी (दि. 7) दुपारपासून रिमझिम वाढली. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 2 हजार 562 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
खडकवासलासह इतर तिन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणक्षेत्रात रिमझिम पावसाने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे जादा पाणी सोडूनही धरणसाखळी जवळपास शंभर टक्के भरून वाहत आहे. आता पावसाचा जोर वाढल्यास जादा पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. (Latest Pune News)
रविवारी दिवसभरात पानशेत येथे 6, वरसगाव येथे 6, टेमघर येथे 4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या पानशेतमधून 1 हजार 283, वरसगाव धरणातून 1 हजार 344 तर टेमघरमधून 413 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
खडकवासला धरण साखळीतील
एकूण पाणी साठवण क्षमता 29.15 टीएमसी
रविवारअखेर साठा
29.10 टीएमसी, 99.83 टक्क