बावडा: इंदापूर तालुक्यातील बावडा आणि इंदापूर येथील आठवडे बाजारामध्ये गावरान गवारीचे दर वाढले आहेत. गवार तब्बल 200 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. बाजारात आवक कमी झाल्याने व मजूरटंचाईमुळे ही दरवाढ झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
बावडा येथील शुक्रवारच्या (दि. 18) आठवडे बाजारात आणि इंदापूरच्या बाजारात देशी गवार प्रतिकिलो 200 रुपयांनी विकली जात होती. मागील काही दिवसांत गवारीची तोडणी व पुरवठा कमी झाल्याने दरात सातत्याने वाढ झाली. त्यामुळे सामान्य ग्राहकांसह शेतकरीवर्गातही चर्चेला उधाण आले आहे. (Latest Pune News)
दरम्यान, कोथिंबिरीच्या दरात मात्र मोठी घसरण झाल्याने शेतकर्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आवक वाढल्याने कोथिंबीर स्वस्त दरात विकली जात असल्याची माहिती इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक प्रतीक घोगरे (गणेशवाडी), प्रगतशील शेतकरी एच. के. चव्हाण (भोडणी), अभिजित फडतरे (बावडा) व प्रसाद देवकर (रेडा) यांनी दिली.