इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी प्रदीप गारटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गारटकर यांना निवडीचे पत्र दिले. मंगळवारी (दि. 11) मुंबई येथे पक्ष कार्यालयात गारटकर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणतेही सत्ताकेंद्र हाती नसताना केवळ जनसामान्यांचा आधार घेत जनसंघर्ष केंद्रस्थानी मानून तब्बल चार दशके दीनदुबळ्यांसाठी झिजणारा जनसामान्यांचा नेता म्हणून ज्यांची ओळख पुणे जिल्ह्याला आहे, असे प्रदीप गारटकर दुसर्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. राजकारणापेक्षा समाजकार्यात रमलेला हा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती, उमद्या मनाचा नेता, भूमिपुत्रांच्या न्याय्य-हक्कासाठी त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळा रस्त्यावर येऊन आंदोलने, मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको आदी सनदशीर मार्गाने जनतेचे प्रश्न त्यांनी सरकार दरबारी मांडले. इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी ते विराजमान झाले.
हे ही वाचा :