FYJC 4th Round Admission 2025
पुणे: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावीच्या चौथ्या फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार नियमित फेरी चारमध्ये प्रत्यक्ष प्रवेशासाठी दि. 1 आणि 2 ऑगस्टऐवजी दि. 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते दि.2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नियमित चौथ्या फेरीत अंतिम मुदतीमध्ये अर्थात मंगळवारी (दि. 29) सायंकाळपर्यंत कॅप प्रवेशासाठी 3 लाख 72 हजार 652 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले. तसेच, 7 हजार 051 विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे. (Latest Pune News)
कोटा अंतर्गत प्रवेशासाठी 13 हजार 829 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. दरम्यान, नियमित फेरी एक, दोन आणि तीनमध्ये मिळून एकूण 8 लाख 11 हजार 731 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात निश्चित केलेला आहे.
प्रवेशासाठी 14 लाख 41 हजार 187 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. अकरावीच्या चौथ्या फेरीसाठी आता तातडीने गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असून, वेळापत्रकात बदल करत नियमित फेरी चारमध्ये प्रत्यक्ष प्रवेशासाठी दि. 01 आणि 02 ऑगस्टऐवजी दि. 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपासून ते दि.2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे. तसेच, सर्व महाविद्यालयांत 11 ऑगस्टपूर्वी वर्ग सुरू करणे आवश्यक आहे.