पुणे

काळेवाडी फाटा येथे फर्निचरच्या दुकानास आग

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : काळेवाडी फाटा येथील बसथांब्या शेजारील फर्निचरच्या दुकानास भीषण आग लागली. ही घटना मंगळवारी (दि.15) दुपारी घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काळेवाडी फाटा बसथांबा परिसरात एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे फर्निचरचे दुकान असून, दुसर्‍या मजल्यावर नागरिक राहत आहेत.

आग लागल्याची घटना घडली तेव्हा दुसर्‍या मजल्यावरील काही घरांत तिघेजण अडकले होते; मात्र स्थानिकांच्या मदतीने या तिघांना खिडकीतून बाहेर काढण्यात यश आले असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तीन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्नीशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत.

इमारतीमधील रहिवाशांच्या घरातील सिलेंडरच्या टाक्या स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढल्या असून, त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.
फर्निचरचे दुकान काळेवाडी फाटा येथील मुख्य रस्त्यावर आहे. त्यामुळे आगीची घटना घडली तेव्हा परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. गर्दीमुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

https://youtu.be/i0BuZhAyZgw

SCROLL FOR NEXT