पुणे

Fraud Case ! केंद्रीय विद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने दीड लाखाला गंडा !

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खडकवासलामधील केंद्रीय विद्यालयात पहिलीत प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने एक लाख 43 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पैसे परत मागितल्याने आरोपीने तक्रारदाराला जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत एनडीए रस्त्यावरील एका सोसायटीत राहणार्‍या व्यक्तीने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात अजित रामकृष्ण घाटपांडे (रा. शीतल प्लाझा, कात्रज-कोंढवा रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराची आरोपी घाटपांडे यांच्याशी दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. खडकवासला परिसरातील गिरीनगर येथील केंद्रीय विद्यालयात मुलीला पहिलीत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष आरोपीने दाखविले होते. तक्रारदार घाटपांडेला वारजे भागातील एका हॉटेलमध्ये भेटले. तक्रारादारकडून एक लाख 43 हजार रुपये घेतले. तक्रारदारासह त्यांच्या ओळखीतील आणखी काही जणांनी घाटपांडेला पैसे दिले होते.

पैसे घेतल्यानंतर त्याने प्रवेश मिळवून न दिल्याने तक्रारदाराने पैसे परत मागितले. पैसे परत देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारदाराने घाटपांडेला जाब विचारला. तेव्हा 'मी तुम्हाला संपवून टाकेल किंवा मी आत्महत्या करेल', अशी धमकी घाटपांडेने त्यांना दिली. त्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक निळकंठ जगताप तपास करत आहेत. घाटपांडेने केंद्रीय विद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT