पुणे

Fraud Case : ट्रेडिंगच्या आमिषाने 20 लाखांची फसवणूक

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमधील ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविल्यानंतर आकर्षक परतावा देण्याच्या बहाण्याने टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक येथील महिलेला तिघांनी 20 लाखांचा आर्थिक गंडा घातला. गुंतवणुकीवर प्रतिमहिना 1 लाख 20 हजार रुपये देण्याचे अ‍ॅग्रीमेंट महिलेसोबत करण्यात आले होते. याप्रकरणी, टिळेकरनगर येथील 37 वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी जोस्त्ना उके (वय 50, रा. अ‍ॅमनोरा टाऊन, हडपसर), हितेंद्र छेडा (वय 30, रा. ठाणे), अशफाक शेख (वय 40, रा. घाटकोपर) या तिघांच्या विरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपींचा परिचय झाल्यानंतर त्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी जर आरोपींकडील ट्रेडिंग व्यवसायात पैसे गुंतविले, तर कसा जास्त परतावा मिळेल, हे प्रलोभन दाखवले. फिर्यादी महिला प्रलोभनाला बळी पडल्या आणि ठगांच्या हवाली 20 लाख रुपये दिले.

आरोपींनी फिर्यादींना विश्वास वाटावा म्हणून प्रतिमहा 1 लाख 20 हजार रुपये परत देण्याचे अ‍ॅग्रीमेंट केले होते. मात्र, त्यानंतर ठरल्याप्रमाणे महिलेला न गुंतवणूक केलेली रोकड देण्यात आली ना नफा. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी कोंढवा पोलिसात धाव घेत तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक उसगावकर करीत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT