पुणे : पुढारी वृत्तसेवा
राज्यात आगामी तीन दिवस थंडी अन् पाऊस, असे मिश्र वातावरण (Weather Forecast) राहणार आहे. २६ ते २९ डिसेंबरदरम्यान राज्यातील सोळा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट, तर सात जिल्ह्यांना हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ४८ तासांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली असली, तरी उत्तर भारतातून येणाऱ्या शीत लहरींमुळे राज्यात बोचरे वारे सुरू आहे. त्यामुळे पहाटे अन् उत्तर रात्री थंडी अन् दिवसा ढगाळ वातावरण, असे विचित्र हवामान डिसेंबरअखेरपर्यंत राहणार आहे. दरम्यान, २६ ते २९ डिसेंबरदरम्यान राज्यातील सोळा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
...या जिल्ह्यांना यलो अलर्ट (कंसात तारखा)
धुळे (२६ व २७ डिसेंबर), नंदुरबार (२६, २७), जळगाव (२६ ते २८), नाशिक (२६ ते २८), अहिल्यानगर (२७, २८), पुणे (२७), छत्रपती संभाजीनगर (२६ ते २८), जालना (२७, २८), परभणी (२६), बीड (२७, २८), अमरावती (२७, २८), बुलडाणा (२७), गोंदिया (२८), नागपूर (२८), वर्धा (२७), वाशिम (२७).
१३.२, महाबळेश्वर १३.६, पुणे १६.६, कोल्हापूर १८.६, मुंबई २२, अहिल्यानगर १४.४, नाशिक १६.८, सांगली १८, सातारा १५, सोलापूर २२, छत्रपती संभाजीनगर १७.४, परभणी १६.८, बीड १८, अकोला १७.१, अमरावती १६.१, बुलडाणा १७.२, ब्रह्मपुरी १५.५, गोंदिया १४.४, नागपूर १४.६, वाशिम १५.८, वर्धा १५.
(२८ डिसेंबर), नंदुरबार (२८ डिसेंबर), अहिल्यानगर (२६ डिसेंबर), पुणे (२६, २७ डिसेंबर), जालना (२६ डिसेंबर), परभणी (२६, २७ डिसेंबर), बीड (२६ डिसेंबर).
उत्तर भारतात नवा पश्चिमी चक्रवात सक्रय झाला आहे. त्यामुळे काश्मीर ते मध्य प्रदेशपर्यंतची सर्व राज्ये गारठली असून, त्या भागांतून शीत लहरी राज्यात येत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तिकडून बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहेत. त्यामुळे राज्यातील सोळा जिल्ह्यांना २६ ते २९ डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात थंडी अन् पाऊस असे मिश्र वातावरण राहील, असा अंदाज आहे.