खेड: राजगुरू वाड्यावर सत्यशील राजगुरू यांच्या हस्ते ध्वजारोहण करून हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना ११७ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी हुतात्मा राजगुरू यांचे वंशज हर्षवर्धन, प्रशांत आणि विलास राजगुरू, स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, राजगुरुनगर बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र सांडभोर, शांताराम भोसले, सुशिल मांजरे उपस्थित होते.
तत्पुर्वी राजगुरुनगर बसस्थानक आवारातील स्मृती शिल्पांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा ॲड. राजमाला बुट्टे पाटील, राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष गणेश थिगळे, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब सांडभोर, ॲड. गणेश सांडभोर, ॲड. बी. एम. सांडभोर, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पिंगळे, डॉ. एच. एम. जरे, महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या कांबळे यावेळी उपस्थित होते. (Latest Pune News)
फुलगाव आपटी (ता. हवेली) येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूल, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. हुतात्मा राजगुरु प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोंडीभाऊ टाकळकर, ॲड. मुकुंद आवटे, अशोक दुगड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. गायक देविदास बोऱ्हाडे व सहकाऱ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले. सुदाम कराळे यांनी निवेदन केले.
हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात ॲड. राजमाला बुट्टे पाटील यांच्या हस्ते शासकीय स्मारकात पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राजगुरुनगर सहकारी बँकेत अध्यक्ष सागर पाटोळे, उपाध्यक्ष अश्विनी पाचारणे व संचालकांच्या हस्ते हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त हुतात्मा राजगुरू सायकलिस्ट क्लबच्या वतीने शहरात सायकल रॅलीचे आयोजन केले होते. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी स्मृती शिल्पांना पुष्पहार अर्पण केले.