दिगंबर दराडे
पुणे: शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘अॅग्रिस्टॅक’ योजनेंतर्गत जिल्ह्यात 8 मेपर्यंत 5 लाख 13 हजार 601 शेतकर्यांनी नोंदणी केली आहे. राज्यात ‘अॅग्रिस्टॅक’च्या नोंदणीत आत्तापर्यंत अहिल्यानगर पहिल्या, तर पुणे जिल्हा तिसर्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे संबंधित शेतकर्यांना शासनाच्या विविध योजनांचा सुलभरीत्या लाभ मिळणार आहे. (Latest Pune News)
योजनांचा मिळणार सुलभरीत्या लाभ
‘अॅग्रिस्टॅक’ योजनेत शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त केलेल्या शेतकर्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, पीक कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, कृषी पायाभूत सुविधा निधी, शेतीविकासासाठी इतर कर्ज, पीक विमा, नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाई, किमान आधारभूत किंमत योजनेत खरेदीमध्ये नोंदणी, बियाणे, खते, कीटकनाशके, कृषी अवजारे आदी शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.
शेतकर्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. ओळख क्रमांकप्राप्त शेतकर्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे योजनेंतर्गत जिल्ह्यात अद्याप नोंदणी न केलेल्या तातडीने नोंदणी करावी.- नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी (कूळ कायदा)