पुणे: गत पाच दिवसांत राज्यभर झालेल्या भीजपावसामुळे राज्यातील पावसाने जुलै महिन्यातील मोठी तूट भरून काढली. त्यामुळे सर्वाधिक पाऊस विदर्भ 14 टक्के, मध्य महाराष्ट्रात 13 टक्के, कोकणात 7 टक्के अधिक बरसला. अतिवृष्टीची कुठेही नोंद झाली नसली तरीही संततधार भीजपावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे.
मराठवाड्यात जूनमध्ये 40 टक्के तूट होती. ती जुलैमध्ये 14 टक्क्यांवर आली आहे. जुलै महिन्यातील आठवडे अत्यंत कमी पावसाचे होते. त्यामुळे सर्वच विभागांत जुलैमध्ये सरासरीत मोठी तूट दिसत होती. मात्र, 23 ते 28 जुलै या पाच ते सहा दिवसांत राज्यातील बहुतांश भागात अत्यंत धीम्या गतीने मात्र दररोज भीज पाऊस सुरू आहे. (Latest Pune News)
महाराष्ट्राची स्थिती (सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त)
कोकण: 7 टक्के अधिक
सरासरी: 1615.8, पडला: 1727.8
मध्य महाराष्ट्र: 13 टक्के अधिक
सरासरी: 355.4, पडला: 400.4
विदर्भ: 14 टक्के अधिक
सरासरी: 446, पडला 508
मराठवाडा 14 टक्के तूट
सरासरी: 280.7, पडला: 242.6
राज्यात बहुतांश भागात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असला, तरी 23 ते 27 जुलै या पाच दिवसांत झालेल्या पावसाने राज्य सरासरीत काठावर आहे. प्रामुख्याने मराठवाड्यातील मोठी तूट 40 टक्क्यांवरुन अवघ्या 14 टक्क्यांवर खाली आली आहे. त्यामुळे एकूणच राज्यातील स्थिती जुलै चिंताजनक वाटत असताना शेवटच्या आठवड्यात बीज पावसाने शेतीला तारले आहे.- डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त हवामान विभाग प्रमुख, आयएडी, पुणे