Fish  Pudhari File Photo
पुणे

Pune Fish Prices: आषाढात मासळी महागली! पुण्यात दरात १० ते २० टक्क्यांची वाढ; मटण-चिकनचे भाव स्थिर

पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी बंदीचा परिणाम; आंध्र, ओडिशा, पश्चिम बंगालवर पुरवठ्याची भिस्त, इंग्लिश अंडीही महागली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आषाढ महिना सुरू झाल्याने मासळीच्या मागणीत वाढ झाली असून, पुरवठा कमी असल्याने मासळीच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंद असल्याने मुख्यतः आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथून मासळीची आवक होत आहे. रत्नागिरी परिसरातूनही अल्प प्रमाणात मासळी बाजारात दाखल होत आहे. नदीतील मासळीची आवक वाढली असली तरी ती मागणीच्या तुलनेत अपुरी ठरत आहे.

दरम्यान, मागणी आणि पुरवठ्यात समतोल असल्याने मटण, चिकन आणि गावरान अंडीचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. मात्र, इंग्लिश अंडीच्या भावात शेकड्यामागे ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. १९) खोल समुद्रातील मासळी ८ ते १० टन, खाडीच्या मासळीची नाममात्र आणि नदीच्या मासळीची १ ते दीड टन इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे २० ते २५ टन इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : १८००-२०००, मोठे : १८००-२०००, मध्यम : १६००-१८००, लहान : १३००-१४००, भिला : ८००-१०००, हलवा : १०००-१२००, सुरमई ८००-१४००, रावस : ९५०-१२००, घोळ : १०००-१२००, करली : ४००-५००, पाला : १०००-१६००, वाम : पिवळी १०००-१४००, काळी : ५००-८००, ओले बोंबील : ४००-६००.

कोळंबी : लहान : ३००-३५०, मध्यम : ४००-५५०, मोठी : ६००-८०००, जम्बो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ९००, लॉबस्टर : १८००-२२००, मोरी : ४००-५००, राणीमासा : ३५०-४००, खेकडे : ३००-४००, चिंबोर्‍या : ६००-९००. खाडीची मासळी - नगली (लहान) : ४००-५००, तांबोशी : ५५०-७००, लेपा : ४००-४५०, बांगडा : २५०-३५०, शेवटे : ३००-४००, बेळुंजी : २००-३००, तिसर्‍या : २५०-३२०, तारली : ३००-४००.

नदीतील मासळी:

रहू : १४०-१८०, कतला : १६०-२००, मरळ : ३००-४००, शिवडा : २००-२५०, खवली : २००-२५०, आम्ळी : १००-१६०, खेकडे : २५०-३५०, चिलापी : ६०-१६०, वाम : ४००-५००. मटण : बोकडाचे ८००, बोलाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २४०, लेगपीस २९०, जिवंत कोंबडी १८०, बोनलेस ३४०. अंडी : गावरान (शेकडा) १२०० डझन १५६, प्रतिनग १३. इंग्लिश (शेकडा) ७८०, डझन १०८, प्रतिनग ९.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT