पुणे: देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीहून गणेश पेठ येथील मासळी बाजारात मासळीची आवक होत आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मासळीच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने सुरमई, पापलेट आणि रावसच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. उर्वरित मासळीचे गत आठवड्यातील तेजीतील दर टिकून असून चिकन, मटण आणि अंडीचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
बाजारात रविवारी (दि. 11) खोल समुद्रातील मासळी 15 ते 20 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 200 ते 400 किलो आणि नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 20 ते 25 टन इतकी आवक झाली, अशी माहिती गणेश पेठ मासळी बाजारातील मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्याचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) :
पापलेट : कापरी : 1900-2000, मोठे : 1600, मध्यम : 1200-1400, लहान : 1000-1200, भिला : 900-1000, हलवा : 600-750, सुरमई 900-1200, रावस : 800-1000, घोळ : 900, करली : 400-450, करंदी : 450, भिंग : 350-400, पाला : 1200-1500, वाम : पिवळी 600- 1200, काळी : 400-450, ओले बोंबील : 200-300.
कोळंबी:
लहान : 200-300, मोठी : 400-600, जम्बो प्रॉन्स : 1400-1500, किंग प्रॉन्स : 800-900, लॉबस्टर : 2000-2200, मोरी : 300-350, मांदेली : 100-140, राणीमासा : 240-300, खेकडे : 300-350, चिंबोऱ्या : 550-650. खाडीची मासळी - सौंदाळे : 280-320, खापी : 250-300, नगली : 400-500, तांबोशी : 500-600, पालू : 300-350, लेपा : 300-350, बांगडा : 200-350, शेवटे : 300-350, पेडवी : 150-200, बेळुंजी : 140-200, तिसऱ्या : 250-300, खुबे : 100-150, तारली : 200-250.
नदीतील मासळी:
रहू : 140-200, कतला : 200-300, मरळ : 350-450, शिवडा : 200-250, खवली : 250-300, आम्ळी : 120-160, खेकडे : 250-400, चिलापी : 60-160, वाम : 550-600. मटण : बोकडाचे 860, बोलाईचे 860, खिमा 860, कलेजी 900. चिकन 250, लेगपीस 300, जिवंत कोंबडी 180, बोनलेस 340. अंडी : गावरान (शेकडा) 1320 डझन 168, प्रतिनग 14. इंग्लिश (शेकडा) 690, डझन 96, प्रतिनग 8.