Fish  Pudhari File Photo
पुणे

Pune Fish Prices: मासळीची आवक निम्म्यावर; पुण्यात माशांचे दर दुप्पट, चिकनही महागले

पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी बंद असल्याने पुरवठा घटला; सर्व प्रकारच्या मासळीच्या किमतीत मोठी वाढ

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी पूर्णपणे बंद असल्याने सध्या पूर्व किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील हावडा परिसरातून मासळीची आवक होत आहे. मात्र, ही आवक नेहमीच्या तुलनेत निम्मीच असल्याने सर्व प्रकारच्या मासळीच्या दरात मोठी वाढ झाली असून भाव जवळपास दुप्पट झाले आहेत. अनेक प्रकारचे मासे बाजारात उपलब्ध नसल्याची माहिती गणेश पेठेतील मासळी व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

मान्सून लांबणीवर पडल्याने त्याचा परिणाम कोंबड्याच्या वाढीवर झाला आहे. त्यामुळे, बाजारात पक्ष्यांची आवक घटली आहे. परिणामी, चिकनच्या दरात किलोमागे २० रुपयांची वाढ झाली आहे. तसेच इंग्लिश अंड्यांच्या दरात शेकड्यामागे ३५ रुपयांची वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यामध्ये समतोल असल्याने मटण आणि गावरान अंड्यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. २१) खोल समुद्रातील मासळी ८ ते १० टन, खाडीच्या मासळीची १०० ते २०० किलो आणि नदीच्या मासळीची ५०० ते ७०० किलो इतकी आवक झाली. तेलंगणा येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १२ ते १५ टन इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : २२००-२८००, मोठे :१५००-१७००, मध्यम : १४००-१५००, लहान : ११००-१३००, भिला : १०००-११००, हलवा : ७००-१०००, सुरमई १०००-२०००, रावस : १०००-१२००, घोळ : ९००-१०००, करली : ४८०-५५०,पाला : १४००-१५००, वाम : पिवळी १४००-१५००, काळी : ५००-६००, ओले बोंबील : ३६०-४५०. कोळंबी : लहान : ३५०-४५०, मध्यम : ४५०-५००, मोठी : ५००-८००, जम्बो प्रॉन्स : १५००-१६००, किंग प्रॉन्स : १०००, लॉबस्टर : १८००-२०००, मोरी : ५००-५५०, राणीमासा : ३००-३५०, खेकडे : ३५०-४००, चिंबोर्‍या : ६००-६५०.

खाडीची मासळी - सौंदाळे : ३००-३५०, तांबोशी : ६००-६५०, बांगडा : ३५०-४००, बेळुंजी : १६०-२००, तिसर्‍या : २८०-३२०, तारली : २८०-३२०. नदीतील मासळी : रहू : १४०-१४०, कतला : १८०-२२०, मरळ : ३००-४५०, शिवडा : २५०, खवली : २५०, आम्ळी : १२०-१६०, खेकडे : २००-४००, चिलापी : ६०-१६०, वाम : ४००-५५०. मटण : बोकडाचे ८००, बोलाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २६०, लेगपीस ३२०, जिवंत कोंबडी २००, बोनलेस ३६०. अंडी : गावरान (शेकडा) ११२० डझन १४०, प्रतिनग १२. इंग्लिश (शेकडा) ७०५, डझन ९६, प्रतिनग ८.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT