बारामती : पुढारी वृत्तसेवा
शहरातील हाॅटेल चैत्रालीला (Hotel Chaitrali) शनिवारी (दि. ५) सकाळी अचानक आग लागली. या दुर्घटनेत हाॅटेल पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
आग लागल्यानंतर बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग अद्यापही धुमसत आहे. त्यात चैत्राली हाॅटेल आगीत भस्मसात झाले आहे. येथे बिअरबारही आहे. हाॅटेलमध्ये कुशनची बाकडी आहेत. त्यामुळे आगीत मोठे नुकसान झाले असावे, असा अंदाज वर्तवली जात आहे. या आगीमुळे शेजारील एका इमारतीलाही हानी पोहचली आहे.
हेही वाचलतं का?