पुणे

Fire Accident : ससून रुग्णालयातील आग आटोक्यात; रुग्ण सुरक्षित

Laxman Dhenge

पुणे : ससून रुग्णालयात शुक्रवारी रात्री नवीन इमारतीत दहाव्या मजल्यावर आग लागल्याची किरकोळ घटना घडली. अग्निशामक विभागाच्या कर्मचार्‍यांनी आग वेळीच आटोक्यात आणल्याने कोणतीही जीवितहानी घडली नाही. सर्व रुग्ण सुरक्षित असल्याचे ससून प्रशासनाकडून सांगण्यात आले. ससून रुग्णालयातील नवीन इमारतीत दहाव्या मजल्यावर आग असल्याचे समजताच अग्निशमन मुख्यालयातून एक व नायडू अग्निशमन केंद्र येथून एक अशी दोन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता.

वॉर्डमधील शौचालयामागे असणार्‍या डक्टमध्ये आग लागून धूर निर्माण झाला होता. रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी तातडीने अग्निरोधक उपकरण वापरून आग आटोक्यात आणल्याने मोठा धोका टळला. वॉर्डमधील रुग्णदेखील सुखरूप आहेत. शौचालयात कोणीतरी धुम्रपान केल्याने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT