पुणे

सांडपाण्याचे नियोजन न करणार्‍या हॉटेल व्यावसायिकावर गुन्हा

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

हॉटेलचे सांडपाणी आणि घनकचर्‍याचे नियोजन न करणार्‍या हॉटेल व्यवसायिकासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलिसांनी शनिवारी (दि. 4) सकाळी दत्तवाडी, नेरे येथे ही कारवाई केली.

पौर्णिमा जालिंदर शितोळे, जालिंदर शितोळे (दोघे रा. दत्तवाडी, ता. मुळशी), गाडे (रा. वाकड), गोरक्षनाथ बन्सी जाधव (रा. दत्तवाडी, ता. मुळशी), विमल बन्सी जाधव (रा. दत्तवाडी, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भरत शांताराम जाधव (30, रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे नेरे दत्तवाडी येथे 'यारा द जंक्शन' नावाने हॉटेल आहे. त्यांनी हॉटेलचे सांडपाणी फिर्यादी यांच्या जागेत सोडून दिले.

तसेच, हॉटेलचा कचरा फिर्यादी यांच्या जागेत टाकून फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी केली. आरोपींनी हॉटेलच्या सांडपाण्याचे व घनकचर्‍याचे नियोजन, व्यवस्थापन करणे गरजेचे असताना देखील ते केले नाही. तसेच, फिर्यादी यांच्या जागेत उत्खनन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://youtu.be/7KwsutS10qQ

SCROLL FOR NEXT