पुणे: थार गाडीतून आलेल्या दोघांनी एका व्यक्तीकडील 50 लाखाची रोकड असलेली बॅग हिसकोल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजता च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. पैसे हिसकवण्याचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. (Latest Pune News)
धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील अभिजीत पवार हे त्यांचा मित्र मंगेश ढोणे याच्यासोबत 50 लाख रुपये घेऊन पुण्यातील एका व्यक्तीला देण्यासाठी आले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास आंबेगाव पठार येथील बाबजी पेट्रोल पंप येथून रस्त्याने पाय चालत जात असताना काळया रंगाच्या थार गाडीतून आलेल्या दोघांनी ढोणे यांच्या हातातील रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढला.
चोरटे नवले पुलाच्या दिशेने पळून गेले. घटनेची माहिती मिळत असताना पोलिसांनी गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली रात्री उशिरापर्यंत पोलीस चोरट्यांचा शोध घेत होते. याबाबत आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मागील काही दिवसापूर्वी शहरात घरफोडीचे आणि जबरी चोरीचे प्रकार चांगलेच वाढीस लागले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.