उजनी धरण मायनसमध्ये; धरणात ६३.६२ टीएमसी पाणीसाठा Pudhari
पुणे

Ujani dam water level: शेतकऱ्यांची चिंता वाढली, उजनी धरण एप्रिल मध्येच मायनसमध्ये

शुक्रवारी सकाळी सहा वाजता उजनी गेलं मायनसमध्ये

पुढारी वृत्तसेवा

Ujani dam water storage

इंदापूर: पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनदायनी ठरलेलं उजनी धरण शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास मायनसमध्ये गेलेल आहे. उजनी धरण प्रशासनाकडून सकाळी सहा वाजता देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार उजनी धरण सध्या ०.०६ टक्के वजा मध्ये आहे. सध्या उजनी धरणात एकूण साठवण क्षमतेच्या ६३.६२ टीएमसी पाणीसाठा आहे.

उजनी धरण मायनसमध्ये गेल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे चिंता वाढली आहे. उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ही १२३ टीएमसी आहे. जेव्हा उजनी धरण १०० टक्के क्षमतेने भरतं तेव्हा उजनी धरणात ११७ टीएमसी पाणीसाठा मावतो. त्यापैकी ५४ टीएमसी पाणीसाठा हा जिवंत पाणीसाठा म्हणून ग्राह्य धरला जातो तर उर्वरित ६३टीएमसी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो आणि आज उजनी ही मायनसमध्ये म्हणजे मृत पातळीत गेलेली आहे.

उजनी धरणातील पाणी पातळी खालीलप्रमाणे

  • दिनांक : १८ एप्रिल २०२५ सकाळी ६.०० वाजता

  • आरडब्ल्यूएल : ४९१.०२५ मीटर

  • पाण्याचा प्रसार क्षेत्र : १९७.४७ चौ.किमी.

साठा-

  • एकूण : १८०१.८३ मीटर घनमीटर (६३.६२ टीएमसी)

  • - थेट ०.९८ मीटर घनमीटर (-०.०३ टीएमसी)

  • थेट : -०.०६ टक्के

आवक:-

मिमी पाऊस (आजचा/संचयी) : ००/५८३ मिमी

बहिर्गमन :-

१) बाष्पीभवन (मिमी / घनमीटर) : ७.०९/१.१२

२) सीना माढा एलआयएस : ०० क्युसेक.

३) दहिगाव एलआयएस : ६० क्युसेक.

४) बोगदा : ६१० क्युसेक.

५) मुख्य कालवा : २९५० क्युसेक.

६) वीजनिर्मिती : १६०० क्युसेक.

७) स्पिलवे : ०० क्युसेक.

८) नदीकाठ : ४४०० क्युसेक.

एकूण नदी : ६००० क्युसेक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT