ओतूर: यंदा पावसाळा लवकर सुरु झाल्याने फूल उत्पादक शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात फुलांची तोडणी करून बाजारात पाठवली. मात्र, विविध प्रकारच्या फुलांची आवक वाढल्याने फुलांच्या किंमती निम्म्याहून कमीच झाल्या.
सणासुदीचे दिवस व लग्नसराई संपल्याने फुलांचे भाव कोसळले. याचाच परिणाम फूल शेतीवर झाला आहे. फूल उत्पादक शेतकर्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. लग्नसराई संपल्याने शोभिवंत फुलांच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. (Latest Pune News)
खामुंडी (ता. जुन्नर) येथील शेतकरी वसंत मराडे यांनी दीड एकर क्षेत्रात झेंडूची लागवड केली आहे. त्यांना त्यासाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च आला. सततच्या पावसामुळे फुलांमध्ये पाणी साठून ती खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. सद्य:स्थितीत बाजारभावही कोलमडल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. पावसाचा व बाजारभावाचा असा दुहेरी फटका सहन करावा लागत आहे.