पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एनडीए मध्ये भाषणाच्या ओघात म्हणाले, कहते है की,यहाँ टेम्परेचर और वातावरण की वजह से एनडीए की स्थापना हुई। लेकीन अंग्रेजोको क्या मालुम था..की,वो ऐसी जगह पर नीव डाल रहे है, जो आनेवाले कई सदियोतक भारत मे सुरक्षा का संस्थान बनेगा...
या त्यांच्या वक्त्यानंतर कार्यक्रम स्थळी एकच कुजबुज सुरू झाली. एनडीए संस्था स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान पंडीत नेहरु यांच्या उपस्थितीत 1954 मध्ये झाली. पुण्याचे तत्कालीन खासदार काकासाहेब गाडगीळ यांच्या प्रयत्नाने एनडीए संस्था पुण्यात आली, असे गुगल सर्च करीत त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली.
काकासाहेब गाडगीळ यांचे नातू काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद गाडगीळ म्हणाले, माझे आजोबा काकासाहेब गाडगीळ यांनी एनडीएसाठी पुणे शहराचा प्रस्ताव दिला. कारण त्यांनी मावळ प्रांताची माहिती दिली. छत्रपती शिवाजीमहाराजांचे मावळे याच ठिकाणी तयार झाले, हा भाग देशाच्या मध्यभागी असून भरपूर पाणी आहे. शिवाय मुंबई देखील जवळ आहे. हे त्यांनी माजी पंतप्रधान नेहरु यांना पटवून दिल्याने 1954 मध्ये पुण्यात एनडीएची स्थापना झाली.