पुणे

Pune Airport : पुणे विमानतळावर एस्केलेटर रॅम्पची सेवा; प्रवाशांना दिलासा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विमानतळावर उतरल्यावर अवजड बॅगा घेऊन कॅबसाठी धावपळ करणार्‍या विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, विमानतळ प्रशासन टर्मिनल ते एरोमॉलला जोडणार्‍या पुलावर 80 मीटरचा एस्केलेटर रॅम्प (सरकणारा) टाकत असून, त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या रॅम्पमुळे प्रवाशांना अवजड बॅगा घेऊन धावपळ करावी लागणार नाही.

पुणे विमानतळावरून दररोज 190 पेक्षा जास्त विमाने उड्डाण करतात. त्याद्वारे दररोज 26 ते 28 हजार प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना कॅब पकडण्यासाठी पुणे विमानतळावर उतरल्यावर एरोमॉलमध्ये जावे लागत आहे. मात्र, टर्मिनल ते एरोमॉल अंतर खूपच लांब असल्याने प्रवाशांना अवजड बॅगांसह मोठी पायपीट करावी लागत होती. त्या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासनाकडून हा एस्केलेटर रॅम्प बसवण्यात येत आहे. यामुळे पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT