पुणे

पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांत रोजगार हमी

अमृता चौगुले

पुणे : जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची आठ तालुक्यांत कामे सुरू नाहीत, तर सहा तालुक्यांमध्ये विविध विभागांमध्ये 49 कामे सुरू आहेत. त्यावर 290 मजूर काम करत आहेत. सर्वाधिक कामे ही खेड तालुक्यात सुरू आहेत.

तीन लाख कुटुंबांकडे जॉब कार्ड

रोजगार हमी योजनेमध्ये काम करण्यासाठी जिल्ह्यात 3 लाख 58 हजार 619 मजूर कुटुंबांनी जॉब कार्ड घेतले आहे. त्यानुसार जिल्ह्यात 7 लाख 73 हजार 8 मजूर क्रियाशील, अर्थात् काम करण्यास उत्सुक आहेत.

जिल्ह्यात रोहयोची 49 कामे

जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत कृषी, वन, सामाजिक वनीकरण व रेशीम विभागात 49 कामे सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यांत या कामांमध्ये वाढ झाली आहे.

विभागनिहाय कामे
विभाग             कामे     मजूर
कृषी                 20      58
वन विभाग        12     110
रेशीम विभाग   17      85
सामाजिक वनीकरण 3 39
तालुकानिहाय कामे
तालुका          कामे   मजूर
आंबेगाव        5        67
बारामती       11      52
दौंड            11      33
जुन्नर          4         38
खेड        17           81

हेही वाचा

SCROLL FOR NEXT