पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर अर्थात आयआयटी कानपूरने जेईई अॅडव्हान्स 2025 परीक्षेचे हॉलतिकीट जाहीर केले आहे. जेईई मेन्समधील पात्र आणि नोंदणीकृत विद्यार्थ्यांना jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे.
हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करावी लागेल. आयआयटी कानपूर 18 मे 2025 रोजी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा घेणार आहे. ही परीक्षा दोन सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये पहिला पेपर सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरा पेपर दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेत असेल. (latest pune news)
परीक्षा केंद्राची माहिती प्रवेशपत्रात उपलब्ध असेल. प्रवेशपत्रात उमेदवाराचे नाव, जेईई (अॅडव्हान्स्ड) 2025 चा रोल नंबर, जेईई मेन्सचा अर्ज क्रमांक, छायाचित्र, स्वाक्षरी, जन्मतारीख, पत्रव्यवहाराचा पत्ता आणि श्रेणी याशिवाय, उमेदवाराला दिलेल्या परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता देखील हॉलतिकीटवर नमूद केला जाईल.
...असे करा हॉलतिकीट डाऊनलोड
सर्वप्रथम जेईई अॅडव्हान्स्डची अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर होम पेजवर उपलब्ध असलेल्या जेईई अॅडव्हान्स्ड हॉल तिकीट 2025 लिंकवर क्लिक करावे. एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना लॉगिन तपशील प्रविष्ट करावे लागतील. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर हॉल तिकीट दिसेल. त्यानंतर हॉलतिकीट तपासून डाऊनलोड करणे गरजेचे आहे.