Edible Oil Pudhari
पुणे

Edible Oil Price Hike: आखाती युद्धाचा परिणाम; खाद्यतेलाच्या दरात वाढ

शेंगदाणा तेलासह सर्व खाद्यतेल डब्यामागे 30-40 रुपयांनी महाग; डाळी-कडधान्यांच्या दरात घसरण कायम

पुढारी वृत्तसेवा

सुभाष किवडे

पुणे: आखातातील युध्दाचा परिणाम खाद्यतेल आयातीवर झ्‌ाल्याने गेल्या आठवडयात शेंगदाणा तेलासह सर्वच खाद्यतेलांच्या दरात डब्यामागे 30 ते 40 रुपयांनी वाढ झाली. गावरान ज्वारी तसेच उन्हाळी बाजरीचीही आवक सुरु झाली आहे. मागणी कमी असल्यामुळे हरभराडाळ, तुरडाळ आणि मुगडाळीच्या दरात आणखी घट झाल्याचे सांगण्यात आले. मार्च महिना सुरु झाला असून पहिल्याच आठवडयात बाजारात तीव्र नाणेभीड जाणवू लागली असून यामुळे अन्नधान्य आणि डाळी कडधान्य बाजारातील उलाढाल मंदावली आहे.

आपल्या देशात तेलबियांचे उत्पादन कमी प्रमाणात होत असल्याने खाद्यतेलाची गरज आयातीव्दारेच भागविली जाते. सोयाबीन, पामोलिन तसेच सुर्यफूल तेलाची मोठया प्रमाणात आयात मलेशिया, इंडोनेशिया, अर्जेंटिना, ब्राझील या देशांमधून होत असते. इराण-इस्त्राईल युध्दाची तीव्रता दिवसेदिंवस वाढत असून याचा आयातीवर परिणाम झाला आहे. यामुळे मागील आठवडयापर्यंत मंदीत असलेल्या खाद्यतेल बाजारात आठवडा अखेरीस मागणी वाढल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. शेंगदाणा तेलाच्या दरात 15 किलोच्या डब्यामागे 40 ते 50 रुपयांनी तर अन्य सर्व खाद्यतेलांच्या दरात 30 ते 40 रुपयांनी वाढ झाली. यामुळे वनस्पती तुपाच्या दरातही डब्यामागे तीस रुपयांनी वाढ झाली. खोबरेल तेलातील मंदी मात्र कायम होती.

साखर दरात किंचित घट, गुळाची दरवाढ कायम : आवक मुबलक प्रमाणात होत असून मागणी साधारण असल्यामुळे गेल्या आठवडयात साखरेच्या दरात क्विंटलमागे पंचवीस रुपयांनी घट झाली. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रति क्विंटलचा दर 4 हजार ते 4 हजार 50 रुपये होता. ऊसाच्या कमतरतेमुळे राज्यातील तसेच अन्य प्रमुख गूळ उत्पादक राज्यातील गुऱ्हाळे बंद झाली आहेत. आगामी रामनवमी, गुडीपाडवा, हनुमानजयंती या सणानिमित्त गुळास मागणी वाढली आहे. अन्य राज्यातुनही मागणी वाढल्याने गुळाची दरवाढ सुरुच आहे. गेल्या आठवडयातही दरात क्विंटलमागे शंभर ते दीडशे रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

येथील घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे होते. साखर (प्रतिक्विंटल) 4000-4050 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2600-2780, रिफाईंड तेल 2130-3080, सरकी तेल 2000-2300, सोयाबीन तेल 1930-2250, पामतेल 1930-2130, सूर्यफूल रिफाईंड तेल 2190-2310, खोबरेल तेल 4300 वनस्पती 1850-2300 रु. तांदूळ:- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3500-4000, सोना मसूरी 4500-5000, एच.एम.टी. कोलम 5500-6500, लचकारी कोलम 6500-7000, चिन्नोर 4500-5000, 1121-11000-11500, आंबेमोहोर (सुवासिक) 14000-16000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार 9500-1000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-8500-9500, इंद्रायणी 5500-6000 रु. गहू - लोकवन नं. 1 4050-4250, लोकवन नं. 2 3650-3800, नं.3 3075-3400, सिहोर नं. 1 5700-6000, सिहोरी 3850-4450, मिलबर 2850-2900 रु. ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6200, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु बाजरी:- महिको नं.1 4000-4200, महिको नं.2 3600-3800, गावरान 3300-3500, हायब्रीड 3050-3300 रु. गूळ :- गूळ नं. 1 4400-4550, गूळ नं.2 4250-4350 गूळ नं.3 4100-4200, एकष्ट्रा 4600-4700, बॉक्स 4200-5300 रु. डाळी:- तूरडाळ 10000-12600, हरभराडाळ 6600-6700, मूगडाळ 9000-10000, मसूरडाळ 7200-7300, मटकीडाळ 8200-8300, उडीदडाळ 10000-12000 रु. कडधान्ये:- हरभरा 5800-6000, हुलगा 4800-5000 चवळी 7000-9000, मसूर 6600-6700, मूग 9000- 9200, मटकी गावरान 12000, मटकी पॉलिश 6400-6500, मटकी गुजरात 6800-7000, मटकी राजस्थान 6800-7000, मटकी सेलम 14000-1420, वाटाणा हिरवा 5500-6000, वाटाणा पांढरा 4500-4600, काबुली चणा 7000-11000 रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.1 5000, साबुदाणा नं.2 4750, साबुदाणा नं.3 4500 रु. वरई भगर :-11000-13000.

सावा भगर 10000-11000 रु. गोटा खोबरे 3200-3400 रु. शेंगदाणा :- जाडा 10500-11000, स्पॅनिश14500-15000, घुंगरु 13500 टीजे 10500 रु. धने :- गावरान 11000-12000, इंदूर 14000-16000 इंदुर सुपर 25000-30000 रु. पोहे :- मध्य प्रदेश 4600-4900,पेण 4600-4800, मध्यम पोहा 4600-4800, दगडी पोहा 4800-5100, पातळ पांहा 5200-5800, सुपर पोहा 5200-5800, भाजका पोहा 650-750, मका पोहा 5500-650, भाजके डाळे 3200-3800, मुरमुरा सुरती (9किलोस) 560, भडंग 850-1100, घोटी 540 रु. रवा, मैदा, आटा- (50 किलोचा भाव) आटा 1750-1800, रवा 1750-1800, मैदा 1750-1800, बेसन:- (50 किलोस) 4100-4400 रु. मीठ :- मीठ खडे (50 किलोस) 300, मीठ दळलेले (50 किलोस) 350 रु. मिरची : काश्मीरी ढब्बी 6000-65000, ब्याडगी 35000-50000, लवंगी तेजा 21000-22000, गुंटूर 23000- 25000, खुडवा गुंटूर 11000-13000, खुडवा ब्याडगी 13500-14000 रु. नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 2100-2300, मद्रास 4500-5000, पालकोल जुना 2500-2600, सापसोल 4500-5200 रु.

डाळी-कडधान्ये मंदीतच

डाळी कडधान्य बाजारावरील मंदीचा प्रभाव कायम आहे. आवक मुबलक प्रमाणात होत असली तरी मार्च महिना सुरु झाल्यामुळे उलाढाल मंदावली आहे. नव्या हरभऱ्याची आवक वाढली असून गेल्या आठवडयातही हरभरा आणि हरभराडाळीच्या दरात क्विंटलमागे आणखी दोनशे रुपयांनी घट झाली. मागणी कमी असल्यामुळे भारी प्रतीच्या तुरडाळीच्या दरात 200 रुपयांनी तर मुगडाळीच्या दरात 300 रुपयांनी घट झाली. मटकीच्या दरातही आणखी 200 ते 500 रुपयांपर्यंत घसरण झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT