Chakan APMC Market Rates: चाकण मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढली; भाव स्थिर

भाजीपाला व पालेभाज्यांच्या दरात तेजी; बाजारात 6.10 कोटींची उलाढाल
Onion
OnionPudhari
Published on
Updated on

अविनाश दुधवडे

चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढली. मात्र, भाव स्थिर राहिले. हिरवी मिरची, बटाटा, लसूण व वाटाण्याची मोठी आवक झाली. चवळी, कोबी, फ्लॉवर, दोडका, कारले, शेवगा व भेंडीचे भाव तेजीत होते. लसणाची भरपूर आवक झाली. पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर, पालक व मेथीची उच्चांकी आवक होऊनही भाव कडाडले. एकूण उलाढाल 6 कोटी 10 लाख रुपये झाली.

Onion
Pune Fish Market Prices: पुणे मासळी बाजारात आवक मुबलक; चिकन महाग, अंड्यांच्या दरात घसरण

कांद्याची एकूण 9 हजार क्विंटल आवक झाली. कांद्याला 1,400 रुपये भाव मिळाला. बटाट्याची एकूण आवक 1,400 क्विंटल झाली. बटाट्याला 1,200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 345 क्विंटल झाली. मिरचीला 6 हजार रुपयांपासून ते 8,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Onion
Uber Driver Murder: माळशेज घाटात उबेर चालकाचा खून; आरोपीला अटक

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे -: कांदा - एकूण आवक - 9,000 क्विंटल. भाव क्रमांक - 1. 1,400 रुपये, भाव क्रमांक 2. 1,200 रुपये, भाव क्रमांक 3. 800 रुपये. बटाटा - एकूण आवक - 1,400 क्विंटल, भाव क्रमांक 1. 1,200 रुपये. भाव क्रमांक 2. 1,000 रुपये. भाव क्रमांक 3. 800 रुपये.

Onion
RTE Admission Maharashtra: आरटीई प्रवेशासाठी 20 शाळांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द; राज्यात जागा वाढल्या

फळभाज्या : एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे : टोमॅटो - 322 क्विंटल (1,000 ते 1,600), कोबी - 265 क्विंटल (400 ते 600), फ्लॉवर - 222 क्विंटल (8,000 ते 12,000), वांगी - 82 क्विंटल (2,000 ते 3,000), भेंडी - 92 क्विंटल (3,000 ते 4,000), दोडका - 58 क्विंटल (3,000 ते 4,000), कारली - 68 क्विंटल (2,000 ते 3,000), दुधीभोपळा - 55 क्विंटल (1,000 ते 2,000), काकडी - 122 क्विंटल (1,000 ते 2,500), फरशी - 52 क्विंटल (2,000 ते 3,000), वालवड - 54 क्विंटल (2,000 ते 5,000), ढोबळी मिरची - 148 क्विंटल (3,000 ते 4,000), चवळी - 42 क्विंटल (2,000 ते 3,000), वाटाणा - 75 क्विंटल (3,000 ते 4,000), गाजर - 120 क्विंटल (1,500 ते 2,000), गवार - 28 क्विंटल (7,000 ते 9,000) आले - 150 क्विंटल (3,500 ते 4,500).

Onion
MPSC State Service Main Exam: एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली

पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे - मेथी - एकूण 21 हजार 392 जुड्या (500 ते 800), कोथिंबीर - एकूण 32 हजार 941 जुड्या (500 ते 800), शेपू - एकूण 3 हजार 570 जुड्या (600 ते 900), पालक - एकूण 3 हजार 295 जुड्या (8,000 ते 12,000).

जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 50 जर्सी गाईंपैकी 35 गाईंची विक्री झाली. (15,000 ते 70,000 रुपये), 85 बैलांपैकी 60 बैलांची विक्री झाली. (10,000 ते 40,000 रुपये), 140 म्हशीं पैकी 110 म्हशींची विक्री झाली. (30,000 ते 80,000 रुपये), 9,500 शेळ्या - मेंढ्यापैकी 8 हजार शेळ्यांची विक्री झाली. त्यांना 2,000 रुपयांपासून ते 15 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news