दुर्गेात्सवामुळे शहरातील वाहतुकीत बदल File Photo
पुणे

Pune Traffic Change: दुर्गेात्सवामुळे शहरातील वाहतुकीत बदल; 'या' भागातील रस्ते वाहतुकीस बंद

नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध मंदिरांच्या परिसरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Durga Festival traffic Pune

पुणे: नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध मंदिरांच्या परिसरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतु:शृंगी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर तसेच सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. या भागातील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत.

नवरात्रोत्सवात बुधवार पेठेतील श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होते. सोमवारपासून (22 सप्टेंबर) अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंतचा (हुतात्मा चौक) रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. (Latest Pune News)

बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौकदरम्यान एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते श्री तांबडी जोगेश्वरीदरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून अन्य वाहनांसाठी बंद राहणार आहे. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे, तसेच शनिवार पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी वाहने नदीपात्रातील रस्ता, मंडईतील वाहनतळावर लावावीत.वाहतूक वेताळबाबा चौकमार्गे वळवली जाणार सेनापती बापट रस्त्यावरील श्री चतु:शृंगी मंदिर परिसरात गर्दी झाल्यास या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या भागात गर्दी वाढल्यास सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक वेताळबाबा चौकमार्गे दीप बंगला चौक, ओम सुपर मार्केटमार्गे वळविण्यात येणार आहे.

श्रीसूक्तपठणानिमित्त वाहतूक बदल

श्रीसूक्तपठणानिमित्त मंगळवारी (23 सप्टेंबर) सकाळी पाच ते सात यादरम्यान सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार असून, स्वारगेटकडून सारसबागमार्गे स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे.

मित्रमंडळ चौकाकडून पूरम चौकाकडे येणारा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मित्रमंडळ चौकातून येणाऱ्या वाहनांनी सावरकर चौकातून सिंहगड रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे तसेच सिंहगड रस्त्याने सावरकर चौकात येणाऱ्या वाहनांनी लक्ष्मीनारायण चौकातून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई

भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. नेहरू रस्त्याने श्री भवानी माता मंदिराकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. नेहरू रस्ता ते श्री भवानी माता मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. गर्दी वाढल्यास नेहरू रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT