पुणे

ड्रग्जमाफियांना कठोर शिक्षा होईल : नीलम गोर्‍हे

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ड्रग्जमाफियांना अटक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धागेदोरे शोधून काढू असे सांगितले होते. पुण्याच्या नवीन पोलिस आयुक्तांनी ड्रग्ज मोहीम चालू केली आहे. ड्रग्जचे जाळे फक्त शहरापुरते न राहता देशभर झाले आहे. या आरोपींना कठोर शिक्षा होईल, याची खात्री असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी केले.
पुण्यामध्ये गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

लोकसभेमध्ये महिलांचे मतदान वाढविण्यासंदर्भात गोर्‍हे म्हणाल्या, महिलांचे मतदान वाढविण्यासाठी शिवदुर्गा मोहीम राबवली जाणार आहे. त्यामाध्यमातून मतदान प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्याचा उद्देश असून, अनेक लोकसभा मतदारसंघात ही मोहीम राबवली जाणार आहे. मराठा आरक्षण विधेयक केलं, अधिकृतरीत्या आरक्षण मिळाले आहे. मनोज जरांगे यांनी तळमळीने काम केलं, जसे पुढे जाईल तसे आरक्षणचा फायदा होईल, असेही गोर्‍हे म्हणाल्या.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT