पुणे

डीआरडीओ, एचएएल, ऑर्डिनन्स फॅक्टरी सक्षम करणार : अजय भट

Laxman Dhenge

पुणे : केंद्र सरकार शहरातील डीआरडीओ, एचएएल आणि आर्डिनन्स फॅक्टरी अधिक सक्षम करणार आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी चाकणमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली. शिवजयंतीच्या मुहूर्तावर चाकणमधील निबे लिमिडेट या संरक्षण दलासाठी सुटे भाग तयार करणार्‍या कंपनीच्या विस्तारीकरणाचे उद्घाटन भट यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी संरक्षणदल प्रमुख आर. हरिकुमार, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भट म्हणाले, संरक्षण दलाच्या यंत्रसामग्रीसाठी आतापर्यंत आपण बाहेरच्या देशांवर अवलंबून होतो. मात्र, 2014 पासून आपण आत्मनिर्भर भारत योजनेत कायापालट केला आहे. संरक्षण दलाला लागणारे सर्व सुटे भाग भारतीय उद्योजकांकडून तयार करून घेत आहोत. शंभर टक्के देशी तंत्रज्ञान वापरून आपण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी पुणे शहरातील डीआरडीओ, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स अणि ऑर्डिनन्स फॅक्टरीकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आत्मनिर्भर भारत योजनेत या संस्थांची नव्याने पुनर्बांधणी करण्यात येत आहे. या संस्थांमधून जागतिक दर्जाचे संशोधन सुरू झाले आहे. त्याला आणखी बळकटी देण्यात येत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT