Dr Nivedita Ekbote Pune Pudhari
पुणे

Dr Nivedita Ekbote Pune: प्रभाग 12 ‘ड’मध्ये डॉ. निवेदिता एकबोटे विजयी; पाणी, रस्ते व वाहतूक प्रश्नांवर भर

भाजपच्या नव्या नगरसेविकांचा निर्धार; सामान्य नागरिक व प्रशासनाच्या समन्वयातून प्रश्न सोडविणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पाणीपुरवठा, रस्ते व वाहतुकीचे प्रश्न, हे माझ्या प्रभागासह शहरातील मुख्य प्रश्न आहेत. योग्य व्यवस्थापनाद्वारे ते सुटू शकतात. हे प्रश्न सोडविण्यावरच माझा प्रामुख्याने भर राहणार आहे. सामान्य नागरिक व प्रशासन, यातील समन्वयाने हे प्रश्न सुटू शकतात, असा माझा विश्वास आहे. येत्या काही दिवसांत याची प्रचिती येईल. नगरसेवकपद हे राजकारणातील पहिली पायरी असून, राज्याचे आणि देशाचे धोरण ठरविण्याच्या दृष्टीने आणखी मोठा पल्ला मला गाठायचा आहे, असा निश्चय प्रभाग 12 ‌‘ड‌’मधून विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवार प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांनी दै. ‌‘पुढारी‌’शी बोलताना व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक 12 : छत्रपती शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी या प्रभागातून डॉ. निवेदिता एकबोटे ह्या ‌‘ड‌’ गटातून भाजपकडून उभ्या होत्या. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग््रेासचे माजी नगरसेवक व मातब्बर राजकारणी दीपक ऊर्फ बाळासाहेब बोडके उभे होते. अत्यंत चुरशीच्या लढतीत एकबोटे 13 हजार 947 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी बोडके यांचा 1578 मतांनी पराभव केला. याच भागात लहानाच्या मोठ्या झालेल्या निवेदिता एकबोटे यांना घरातूनच राजकारण व समाजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यांचे वडील डॉ. गजानन एकबोटे हे प्रोग््रेासिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सर्वेसर्वा होते, तर त्यांची आई ज्योत्स्ना एकबोटे माजी नगरसेविका व काका मिलिंद एकबोटे हे माजी नगरसेवक होते.

डॉ. निवेदिता लहापणापासून कुशाग््रा बुद्धीच्या व शिक्षणाची आवड असणाऱ्या आहेत. त्यांनी इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन शाखेतून अभियांत्रिकीची पदवी घेतली. यासोबच आयआयएम अहमदाबाद येथून व्यवस्थापन शास्त्राची पदवी घेतली. तसेच, सामाजिक शास्त्राचा अभ्यास देखील त्यांनी केला आहे. महाविद्यालयीन जीवनापर्यंत त्यांचा राजकारणाशी संबंध नव्हता. त्यांचा एनजीओ सुरू करण्याचा मानस होता. आयआयएम अहमदाबादला असताना त्या त्यांच्या क्लासच्या लीडर होत्या. त्यांनी राजकारणात जावे, असे त्यांचे मित्र त्यांना म्हणायचे. पुढे त्यांनी त्यांची पीएच.डी. देखील पूर्ण केली. 2020 मध्ये शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची भेट झाली. भाजप युवा मोर्चाचे काम करण्यासाठी तरुणांची गरज होती. पुण्यात खास भाजप युवती मोर्चाची विंग सुरू करून त्याचे नेतृत्व निवेदिता यांना देण्यात आले. या संघतेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामे केली. युवतींचे प्रश्न मांडलेत. त्यांची भाषणे पाहून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश संघटनेत त्यांची निवड केली. त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र भाजप युवा मोर्चा युवती सेलची मोठी जबाबदारी दिली. दरम्यान, प्रोग््रेासिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्यपदाची जबाबदारी आली. ही जबाबदारी देखील त्या लीलया सांभाळत आहेत.

2023 पासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यांनी राज्यभर प्रवास केला. सर्व समस्या जाणून घेतल्या. युवा मोर्चाच्या शाखा काढल्या. आई नगरसेविका असल्याने त्यांची कामे देखील त्यांनी जवळून पाहिली. 2026च्या निवडणुकीत भाजपने तरुणांना प्राधान्य दिल्याने डॉ. निवेदिता यांना महापालिका निवडणुकीचे तिकीट मिळाले. त्यांनी या संधीचे सोने केले आणि त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या मातब्बर उमेदवाराचा त्यांनी पराभव केला.

..या समस्या प्रामुख्याने सोडविणार

  • छत्रपती शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी प्रभागात 60 टक्के सोसायट्या, तर 40 टक्के झोपडपट्टी भाग आहे.

  • या भागात प्रामुख्याने असलेली वाहतूक कोंडी, पाण्याचा प्रश्न सोंडविण्यावर एकबोटे यांचा भर राहणार आहे.

  • अनेक सोसायट्या या जुन्या झाल्या असल्याने त्यांच्या रिडेव्हलपमेंटचा प्रश्न मार्गी लावणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT