पुणे

टीडीआरमध्ये शंकेला जागा; उपमुख्यमंत्री अजित पवार

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये वाकड येथील भूखंड टीडीआर घोटाळा झाल्याचे अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. एका खासगी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवार (दि. 25) पिंपरी-चिंचवडमध्ये आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, टीडीआर संदर्भात महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना बोलावून त्यांच्याकडून माहिती घेतली.

अनेक कागदपत्रे विविध अधिकार्‍यांना दाखवली. त्यामध्ये आयुक्त सिंह हे नाही म्हणत असले तरी शंका घेण्यासाठी जागा आहे. त्यामुळे मी मुंबईला जाऊन पुन्हा या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे. राज्य सरकारला हा निर्णय थांबवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे याची शहानिशा केली जाईल. काही गडबड असेल तर निर्णयाला स्थगिती दिली जाईल. काही गडबड नसेल तर थांबवण्याचा प्रश्न येत नाही, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT