पुणे

पुण्यात बीएच सिरीज घेण्यात दुपटीने वाढ

Laxman Dhenge
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात बीएच (भारत) सिरीजच्या क्रमांकामध्ये दुपटीने वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. 2022 मध्ये पुणेकरांनी आपल्या वाहनांसाठी 3 हजार 758 बीएच सिरीजमधील क्रमांक घेतले होते, तर 2023 मध्ये 7 हजार 42 वाहनचालकांनी हे बीएच सिरीजमधील क्रमांक घेतले आहेत. कामानिमित्त या राज्यातून त्या राज्यात अनेकांना प्रवास  करावा लागतो.
त्यावेळी प्रत्येक राज्यात वाहनचालकांना वाहनक्रमांक सातत्याने बदलून घ्यावे लागतात. मात्र, बीएच (भारत) सिरीजमुळे वाहनचालकांना वाहनाचा क्रमांक बदलावा लागत नाही. एकाच वाहन क्रमांकावर वाहनचालकांना देशभरात आपले वाहन फिरविता येते. अशाच सिरीज मधला वाहन क्रमांक पुणेकरांनी पुणे आरटीओतून 2022 पेक्षा 2023 मध्ये सर्वाधिक घेतला आहे. यात दुपटीने वाढ झाल्याची नोंद पुणे आरटीओमध्ये करण्यात आली आहे.
जे वाहनचालक केंद्र शासनाच्या नोकरीत किंवा मल्टिनॅशनल कंपनीत कार्यरत असतात. त्यांची कामानिमित्त भारतभर बदली होत असते. त्यावेळी त्या वाहनचालकांना आपल्या वाहनांचा क्रमांक बदलावा लागतो. मात्र, बीएच सिरीजमधील वाहन क्रमांक असल्यास वाहन क्रमांक बदलावा लागत नाही. अशाच बीएच सिरीजमधील वाहन क्रमांक घेण्यामध्ये 2023 मध्ये चांगली वाढ झाली आहे.
– संजीव भोर,  प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
हेही वाचा
SCROLL FOR NEXT