मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : भीमनगर येथील महापालिकेच्या राजश्री शाहू महाराज दवाखान्यामध्ये डॉक्टर वेळेवर येत नसल्याने रुग्णांची उपचारांअभावी हेळसांड होत आहे. याकडे आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी करणारे निवेदन नागरिकांनी दोन महिन्यांपूर्वी प्रशासनास दिले आहे. मात्र, त्याची अद्याप दखल घेण्यात आली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. या दवाखान्यामध्ये बी. टी. कवडे रोड, भीमनगर व जहांगीरनगर परिसरातील नागरिक उपचारासाठी येतात.
डॉक्टर सकाळी वेळेवर दवाखान्यात येत नाहीत. तसेच अनेकदा दुपारनंतर येथे डॉक्टरच नसतात. त्यामुळे रुग्णांना बराच वेळ वाट पाहून घरी जावे लागते. सर्वसामान्य नागरिकांना खासगी दवाखान्याचा खर्च परवडत नसल्याने ते येथे येतात; परंतु या दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना उपचार मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
हेही वाचा