Pune RTO  Pudhari
पुणे

Pune Vehicle Fitness Certificate: दिवे आरटीओ कार्यालय रविवारीही खुले; योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाला प्राधान्य

वाहनमालकांची गैरसोय टाळण्यासाठी शासकीय सुटीतही कामकाज सुरू राहणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, तसेच वाहनचालक व वाहनमालकांची गैरसोय टाळण्यासाठी दिवेत रविवारी (दि. ७ जून) शासकीय सुटीच्या दिवशीही कामकाज सुरू राहणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी कळविले आहे.

वाहनचालक, वाहनमालक तसेच विविध वाहन संघटनांनी आपल्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी संबंधित कार्यालयात वाहने तपासणीसाठी सादर करावीत.

तसेच सर्व स्कूल बसचालक आणि मालकांनी आपल्या स्कूल बसची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करून घ्यावे. स्कूल बस वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे, असेही भोसले यांनी कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT