Transfer Orders (File Photo)
पुणे

Pune News: जिल्ह्यातील १६ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या पदभार चंद्रशेखर यादव यांच्याकडे तर वैशाली पाटील यांची वर्षभरात बदली

पुढारी वृत्तसेवा

बारामती : जिल्हा पोलिस दलातील ११ पोलिस निरीक्षकांच्या पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी बदल्या केल्या. पाच सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्याही बदल्या कऱण्यात आल्या. बहुचर्चित बारामती तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक वैशाली पाटील यांची वर्षभरातच बदली करण्यात आली आहे. बारामती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची तेथे नेमणूक कऱण्यात आली आहे. (Pune Latest News)

जिल्हा पोलिस अधिक्षकांनी बुधवारी (दि. ८) रात्री उशीरा बदल्यांचे आदेश जारी केले. अन्य पोलिस निरीक्षकांच्या बदल्या पुढीलप्रमाणे - (कोठून कुठे) : कुमार रामचंद्र कदम (वडगाव मावळ ते सासवड), सचिन दत्तात्रय वांगडे (हवेली ते उरुळी कांचन), रवींद्र दत्तात्रय पाटील (कामशेत ते नियंत्रण कक्ष), सपोनि महादेव चंद्रकांत शेलार (नारायणगाव ते स्थानिक गुन्हे शाखा), अभिजित सुभाष देशमुख (परकीय नागरिक नोंदणी कक्ष ते वडगाव मावळ), वैशाली रावसाहेब पाटील (बारामती तालुका ते हवेली), शंकर मनोहर पाटील (उरुळीकांचन ते कामशेत), चंद्रशेखर मोहनराव यादव (बारामती वाहतूक ते बारामती तालुका), श्रीशैल रामचंद्र चिवडशेट्टी (नियंत्रण कक्ष ते बारामती वाहतूक), ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी (सासवड ते नियंत्रण कक्ष), सपोनि नितीन हनुमंत खामगळ (वेल्हा ते नियंत्रण कक्ष). सपोनि प्रवीण महादेव सपांगे (यवत ते नारायणगाव), किशोर विठ्ठल शेवते (वाचक अपोअ, पुणे ते वेल्हा), सपोनि गजानन रतन चेके (वाचक उविपोअ बारामती ते नियोजित पोलिस ठाणे निरा-नृसिंहपूर)

कर्तव्यातील कसूर वैशाली पाटील यांना भोवली; यादव यांना कामाचे बक्षिस

बारामती तालुका पोलिस ठाण्यात नुकतीच झालेली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई आणि अन्य प्रकरणांमुळे पोलिस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांना खुलासा सादर कऱण्याचेही नुकतेच आदेश दिले होते. त्यामुळे त्यांची बदली होणार अशी चर्चा होती, ती अखेर खरी ठरली. दुसरीकडे बारामती वाहतूक शाखेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱया चंद्रशेखर यादव यांना बारामती तालुका पोलिस ठाण्यात संधी दिली गेली. यादव यांनी वाहतूक शाखेतही आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT