पुणे

Pravin Tarde : ‘फकिरा’ कादंबरीवर चित्रपट करणार; दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची माहिती

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'फकिरा' पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले, हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. मी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वाचले आहे. त्यांचे साहित्य खूप मोलाचे आहे. भविष्यात मला जर संधी मिळाली, तर मी नक्कीच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 'फकिरा' कादंबरीवर मानधन न घेता चित्रपटनिर्मिती करेन, असे प्रतिपादन दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे
यांनी केले.

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे तेल वात समिती व पुणे शहर जिल्हा मातंग समाज यांच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 'फकिरा' पुरस्कार तरडे यांना प्रदान करण्यात आला. यशवंत नडगम यांना मसाहित्यरत्न अण्णा भाऊ साठेफ पुरस्कार, प्रतिभा नारी परिवर्तन संस्था यांना सामाजिक कार्याबद्दल 'गौरव समाजभूषण'पुरस्कार प्रदान करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. रमेश बागवे, आयोजक सुखदेव अडागळे, अविनाश बागवे, रवी पाटोळे, दयानंद अडागळे, सुशीला नेटके आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य महासागरासारखे विशाल असून, साठे यांनी विपुल साहित्यलेखन केले. त्यांच्या 'फकिरा' कादंबरीवर भविष्यात चित्रपट निघाला, तर प्रवीण तरडे यांना मी सर्वतोपरी मदत करेन आणि या कलाकृतीसाठी एक रुपयादेखील कमी पडणार नाही, याची काळजी घेईन. महेश सकट यांनी सूत्रसंचालन केले. श्रीराम कांबळे यांनी आभार मानले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT