पुणे : पुढारी वृत्तसेवा : गोखले इन्स्टिट्यूटमधील प्राध्यापक काकाली मुखोपाध्याय यांनी दोनवेळा घेतलेल्या वेतनप्रकरणी
डॉ. अजित रानडे यांनी प्रा. मुखोपाध्याय यांचा राजीनामा घेतला. त्यावर शिक्षण संचालक डॉ. केशव तुपे यांनी गोखले इन्स्टिट्यूटला अहवाल सादर करा, अशी नोटीस काढली आहे. प्रा. मुख्योपाध्याय यांनी केलेल्या घोटाळ्याचे वृत्त 'पुढारी'त प्रसिध्द होताच त्यांची पाठराखण करणार्या कुलगुरू रानडे यांनी प्रा. मुखोपाध्याय यांचा राजीनामा घेतला. प्रा. मुखोपाध्याय या विदेश दौर्यावर सुट्टीवर गेल्यावरही त्यांनी दोन वेतन घेतले, ही बाब दडवून ठेवली होती. मात्र, प्रकरण अंगलट येत असल्याचा अंदाज येताच डॉ. रानडे यांनी ही चाल खेळली. पण, प्रकरण इथेच थांबले नाही. शिक्षण संचालकांनी याची दखल घेत संस्थेला याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश
दिले आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसर पात्र नसतानाही डॉ. रानडे यांना फेब्रुवारी 2022 मध्ये कुलगुरुपदी बसविण्यात आले. त्यावर आक्षेप घेत प्राध्यापक मुरलीकृष्णा यांनी माहिती अधिकारात सर्व माहिती उघडकीस आणली. त्यामुळे सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या विश्वस्तांना जाग आली. रामाकांत लंका यांनी प्रा. मुखोपाध्याय यांच्या नेमणुकीबाबत व्यवस्थापन मंडळात प्रश्न उचलला. त्याचवेळी मनोज कर या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्याला त्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मिलिंद देशमुख यांनी बाहेर काढले. त्यांच्या जागेवर व्यावसायिक असलेले किर्लोस्कर यांना सदस्य केले. विश्वस्त लंका यांनी शिक्षण संचालकांकडे या प्रकाराची तक्रार केली.
मिलिंद देशमुख यांनी स्वतःच्या मुलाला सर्व्हन्ट्स सोसायटीमध्ये आजीवन सदस्य करण्यासाठी डॉ. रानडे यांना अध्यक्षांच्या वतीने मुभा दिलेली होती. कारण, डॉ. राजीव कुमार यांना अध्यक्ष दामोदर साहू यांनी गोखले इन्स्टिट्यूटचे कुलपती म्हणून नेमले. डॉ. राजीव कुमार यांनी डॉ. रानडे यांना कुलगुरू करण्यासाठी ही खेळी खेळली व मुखोपाध्याय यांना रानडे यांनी अभय दिले. अशी शृंखला असताना शिक्षण संचालक डॉ. केशव तुपे यांनी मुखोपाध्यायप्रकरणी अहवाल मागितल्याने प्रकरणाला कलाटणी मिळाली.
एकीकडे मिलिंद देशमुख यांच्या मुलाला, तर दुसरीकडे अध्यक्ष दामोदर साहू यांच्या मुलगा आणि पी. के. द्विवेदी यांच्या नातवाला कोरम पूर्ण न करता आजीवन सदस्य करण्यासाठी बदल अर्ज धर्मादाय आयुक्तांकडे देण्यात आला, त्यावर हरकत घेण्यात आली. त्यासाठी धर्मादाय उपायुक्त राहुल मामू यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल असून, त्यावर 9 फेब—ुवारी 2024 रोजी काय प्रक्रिया होईल, याबाबत उत्कंठा आहे. याबाबत प्रवीणकुमार राऊत यांचे वकील अॅड. राजेश ठाकूर बाजू मांडत आहेत. शिक्षण संचालकांनी दिलेल्या नोटिशीमुळे हरकतदारांनी न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
हेही वाचा