पुणे

Navratri 2023 : नवरात्रीच्या उपवासादरम्यान आहारात हवी सुसूत्रता; आहारतज्ज्ञांचा सल्ला

अमृता चौगुले

पुणे : मन आणि आरोग्य यांचा परस्पर जवळचा संबंध आहे. दुर्बल झालेले मन सुदृढ व्हावे, यासाठी देवीची उपासना केली जाते. मनोभावे उपासना करताना शरीर हलके असेल, तर शरीरातील विविध चक्रे शुद्ध होतात. म्हणूनच नवरात्रामध्ये उपवास करताना हलक्या आहाराला प्राधान्य द्यावे, असा सल्ला आहारतज्ज्ञ अर्चना रायरीकर यांनी दिला आहे. आरोग्यशास्त्रानुसार सर्वसाधारणपणे शरीरातील जल, आप, पृथ्वी, अग्नी आणि आकाश या पाच तत्त्वांमधील संतुलन बिघडल्यास शरीराच्या तक्रारी सुरू होतात. नवरात्र सुरू होत असताना पाऊस नुकताच संपलेला असतो आणि बदलत्या ऋतूची चाहूल लागलेली असते. पचन शक्ती देखील कमजोर असते.

अशा वेळी पोटाला थोडा आराम देणे महत्त्वाचे आहे. या वेळी योग्य पद्धतीने उपवास केल्याने शरीर रोगमुक्त होऊ शकते. नवरात्रात काही जण नऊ दिवस, पाच दिवस किंवा दोन दिवसांचा उपवास करतात. उपवासाच्या काळात खिचडी, वडे, उपवासाची मिसळ, थालिपीठ, वेफर्स, असे पदार्थ खाल्ल्याने पोट हलके राहण्याऐवजी आणखी बिघडते. त्यामुळे उपवास म्हणजे पचनक्रियेला आराम हे सूत्र लक्षात घेऊन हलक्या आहाराला महत्त्व द्यावे, असे आहारतज्ज्ञ पैर्णिमा पंडित यांनी सुचवले आहे.

आजकाल सतत आणि चुकीच्या खाण्यामुळे गॅस, अ‍ॅसिडीटी, अपचन यांचे प्रमाण वाढले आहे. उपवासाच्या निमित्ताने शरीरातील आहाराचे आणि आरोग्याचे चक्र पूर्ववत करण्याची संधी मिळते. योग्य उपवासाने पचनशक्ती सुधारते आणि खरी भूक लागायला सुरुवात होते. म्हणूनच नवरात्रीच्या काळामध्ये तेलकट आणि पचायला जड पदार्थ खाण्याऐवजी फलाहार, द्रवरूपी पदार्थांना प्राधान्य द्यावे.

– अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT