पुणे

पुणे : कमला नेहरू’मधील डायलिसिस मशिन बंद

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमधील डायलिसिसच्या 15 मशिनपैकी 13 मशिन बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. कमला नेहरू रुग्णालयात लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेकडून डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. शहरातील गरीब लोकांना माफक दरात सुविधा उपलब्ध व्हावी, या हेतूने हे सेंटर सुरू केले आहे. पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा 5 वर्षे कालावधी वाढवून देण्यात आला आहे.

या सेंटरमध्ये 400 रुपयांमध्ये डायलिसिस केले जाते. पण, या सेंटरमधील 15 डायलिसिस मशिनपैकी 13 मशिन बंद आहेत. त्यामुळे रुग्णाची गैरसोय होत आहे. रुग्णांच्या नातेवाइकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्याने सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी या सेंटरची पाहणी केली. या वेळी या सेंटरमध्ये नेफ्रालॉजिस्ट अथवा डॉक्टर्स तसेच वैद्यकीयदृष्ट्या माहिती असलेली परिचारिका कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले. तसेच सेंटरमध्ये अस्वच्छता आढळून आली.

जैववैद्यकीय कचरा गेल्या एक ते दीड वर्षापासून साठवून ठेवला असून, त्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेने सेंटरला 25 हजारांचा दंड केला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लायन्स क्लब हे सेंटर चालविण्यास असमर्थ असल्याचा ठपका ठेवला आहे. तसेच संस्थेकडून खुलासा देखील मागविला आहे.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT