पुणे

Ganeshotsav 2023 : ढोल-ताशा पथकांची होतेय चांदी; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढली मागणी

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक गणेश मंडळांकडून ढोल-ताशांच्या पथकांना मागणी वाढली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने ढोल-ताशा पथकांची चांदी होत आहे. अनेक ढोल ताशा पथकांकडून वादनाचा जोरदार सराव केला जात आहे. शहरात 40 ते 50 ढोल ताशा पथके आहेत. तसेच एका पथकात 50 ते 150 सदस्य असतात. यामध्ये प्रत्येकजण आपल्या इच्छेने सहभाग घेतो. तरुणाईसह , शालेय विद्यार्थी, महिलांचा देखील समावेश असतो.

सुपारी 1 लाखाच्या पुढे

शहरातील ढोल-ताशांच्या सुपार्‍या 1 ते 2 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तसेच साध्या पथकांच्या सुपार्‍या 50 ते 80 हजार अशा आहेत. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत अनेक पथके पाच ते सहा लाखांचे उपन्न मिळवतात.

..असा केला जातो खर्च

ढोल-ताशाच्या पथकाला जागा भाडयाने घेऊन मोकळ्या जागेत सराव करावा लागतो. यासोबत ढोल- ताशांचे साहित्य नादुरुस्त झाल्यास त्यासाठी खर्च करावा लागतो. त्यामध्ये ढोल ताशांची पाने, पॉलिशिंग अशा अनेक वस्तूंवर खर्च करण्यात येतो. तसेच पथकातील सदस्यांनाही जेवण, पाणी आणि नाश्त्यावर खर्च करण्यात येतो.

गोरगरिब विद्यार्थ्यांना पथकाच्या माध्यमातून मदत

ढोल ताशा पथकातील गोरगरिब विद्यार्थ्यांना त्यांना शैक्षणिक, वैद्यकीय मदत केली जाते. तसेच काही खर्च पथकातील वस्तूंवर करण्यात येतो.

सर्वाधिक पसंती महिलांची

अनेक महिलांना ढोल-ताशा वाजविण्याचा छंद असल्याने महिला सहभागी होताना दिसतात. अनेक नोकरदार महिला, गृहिणी, तरुणींचा याकडे कल वाढत आहे. त्यामुळे महिलादेखील आपली कला सादर करताना दिसत आहेत. ढोल-ताशा पथकात समावेश होण्यासाठी सर्वाधिक क्रेझ तरुणींची आहे.

…तर तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही

सर्वच पक्षांचे मातब्बर तालुक्यात असताना त्यांनाही विश्वासात न घेता निर्णय होत असेल तर ही लाजिरवाणी बाब आहे, हा प्रकल्प झाला तर तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही, असे सूर्यकांत वाघमारे यांनी सांगितले. तर, केसेसच्या माध्यमातून आंदोलनाचे परिणाम आजही भोगतोय, स्थगिती उठविण्याचा निर्णय मात्र कोणालाही विश्वासात न घेता होतोय, तो नेमका कोणाच्या शिफारशींने झाला हे शोधणे आवश्यक आहे, असे मच्छिंद्र खराडे यांनी सांगितले.

आधी महापालिकेने पाणीचोरी शोधावी

पिंपरी चिंचवडकरांना शुद्ध पाणी पाहिजे, मग आम्ही काय जनावरे आहोत का? आधी महापालिकेने दररोज होणारी पाण्याची चोरी शोधावी व मग आमचे पाणी पळविण्याचा विचार करावा, असे किशोर भेगडे यांनी सांगितले. कुठल्याही परिस्थितीत बंदिस्त जलवाहिनी होता कामा नये, काँग्रेसने या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध केला असून अखेरपर्यंत विरोधच करेल, असे रामदास काकडे यांनी सांगितले. माजी मंत्री व खासदार, आमदार राज्यातील नेत्यांच्या गळ्यातील ताईत आणि आम्ही सगळे तुमच्या मागे, मग अडचण नेमकी कुठंय ? तुम्ही सगळ्यांनी एकत्र या मावळाला वाचवा, असे आवाहन गणेश खांडगे यांनी केले.

लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेणे दुर्दैवी

नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसता, मग स्थगिती उठली कशी? धमक असेल तर ती उठवा. हा प्रकल्प रद्द झालाचं पाहिजे, असे रवींद्र भेगडे यांनी सांगितले. तर तीन शेतकर्‍यांच्या बलिदानानंतरही आपल्याला रस्त्यावर उतरावं लागत हे मोठं दुर्भाग्य आहे व स्थगिती उठवताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही हे मोठं दुःख आहे, असे रुपेश म्हाळसकर यांनी सांगितले. हा प्रकल्प नको म्हणून मावळातील शेतकरी बारा वर्षे संघर्ष करत आहेत. पिंपरी चिंचवडकारांना पाणी मिळतंय, पण ते बंद पाइपलाइनने मिळावं यासाठी कुठल आंदोलन होत नाही, मग हा अट्टहास कशासाठी?, असे ज्ञानेश्वर दळवी यांनी सांगितले. हा तालुका आमची आई आहे, या आईचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे, असे आवाहन भारत ठाकूर यांनी केले.

गणेशोत्सव तोंडावर आल्याने पथकांना विविध भागातून 1 लाखापर्यंत सुपारी मिळत आहे. तसेच पथकाच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नात गरीब मुलांना मदत करण्यात येते.

-जुगनू भाट, संस्थापक अध्यक्ष,
मोरया ढोल ताशा पथक.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT