पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक ३७ (धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय) मध्ये कमालीची उत्कंठा पाहायला मिळत आहे. पाच फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून, दिग्गज उमेदवारांच्या मतांमधील चढ-उतार पाहून कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता. सकाळपासूनच मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांची प्रचंड गर्दी दिसली, प्रत्येक फेरीच्या निकालानंतर घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
प्रभाग ३७ मधील चारही जागांसाठी (अ, ब, क आणि ड) चुरस पाहायला मिळत आहे. पाचव्या फेरीअखेर आकडेवारी समोर आली. किशोर धनकवडे यांनी पाचव्या फेरीअखेर २६,९४१ मतांसह मोठी आघाडी घेतली अन विजयाकडे कूच केली. वर्षा तापकीर यांनी २३,४४४ मते घेत आपली आघाडी मजबूत ठेवली असली, तरी नेहा कुलकर्णी यांच्या मतांची वाढ चुरस निर्माण करत होती. अखेर पाचव्या फेरीअंती तापकीर यांनी जागा ब मध्ये विजय मिळवला. तेजश्री बदक १४,२६२ आणि श्रद्धा परांडे १२,०५६ मते यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. ही जागा कोणाकडे जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, पाचव्या फेरीअंती त्यांच्या लढतीतील चित्र समोर आले आणि तेजश्री बदक यांनी जागा क मध्ये विजय मिळवला.
जागा ड मध्ये अरुण राजवाडे यांनी १५,०३३ मतांनी आघाडी घेतली होती, तरी आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत १०,६६१ ही नावे चढाओढ कायम ठेवून असल्याचे फेऱ्यात दिसून आले, मात्र अखेर राजवाडे यांनी आघाडी घेत जागा ड मध्ये विजय मिळवला.
मतमोजणी केंद्राबाहेर प्रत्येक फेरीच्या अनाउन्समेंटनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारत होता. गुलालाची उधळण आणि विजयाच्या घोषणांनी धनकवडी- सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय परिसर दुमदुमून गेला होता.
प्रभाग क्रमांक 37 - धनकवडी-कात्रज डेअरी
भाजपचे चारही उमेदवार विजयी ...
किशोर धनकवडे - 26,941
वर्षा तापकीर - 23,444
अरुण राजवाडे - 15033
तेजश्री बदक - 14,261